पोवार बोर्डिंग येथे कोजागिरी कार्यक्रम आज

0
159

गोंदिया : स्थानिक कन्हारटोली येथील पोवार बोर्डिंग येथे पवार प्रगतीशील मंच, श्री. प्रगतीशील शिक्षण संस्था, पवार नवयुवक समिती, महिला समितीच्या वतीने १९ ऑक्टोबरला कोजागिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान दुपारच्या सुमारास विविध सांस्कृतीक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी आयोजित कोजागिरीच्या कार्यक्रमात समाजातील दहावी ते इतर विषयात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आयोजित कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. टेकचंद कटरे, तर मुख्य उद्घाटक म्हणून ईश्वरचंद चौधरी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान यावेळी स्व. देऊभाऊ तुरकर स्मृती पुरस्कार, स्व. बी.एम. पटेल स्मृती पुरस्कार, स्व. रामचंद्र हरिणखेडे स्मृती पुरस्कार, स्व. मुन्नालाल चव्हाण स्मृती पुरस्कार व स्व. देवेंद्रभाऊ बिसेन स्मृती पुरस्काराने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण, नवयुवक समितीचे अध्यक्ष प्रवीण पटले, महिला समितीचे अध्यक्ष सौ. आरती कटरे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती तसेच पदाधिकार्‍यांनी केले आहे.