34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ भूसपांदनामुळे तिरोडा-कवलेवाडा मार्गावरील रेलवे पुलाचे काम रखडले

भूसपांदनामुळे तिरोडा-कवलेवाडा मार्गावरील रेलवे पुलाचे काम रखडले

0
362

blank

गोंदिया-जिल्ह्यातून जात असलेल्या मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर तिरोडा येथे महारेलच्यावतीने रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे.गेल्या एक दिड वर्षापासून हे काम सुरु असून जनतेला तिरोड्यातील दोन्ही रेल्वेपूल खुले होण्याकरीता अजून जानेवारी महिन्यापर्यंतची वाट बघावी लागणार असल्याचे समोर आले आहे.विकासाच्या नावावर मोठमोठे नेते येऊन भूमिपुजन करुन गेले असले तरी विशेष म्हणजे तिरोडा रेल्वेस्थानकाशेजारील  कवलेवाडा मार्गाला जोडणार्या उत्तरेकडील उड्डाणपुलाचे अर्धवट बांधकाम झाले असून उर्वरित बांंधकाम मात्र भूसपांदनाच्या अडचणीमुळे रखडल्याचे चित्र आहे.उत्तरेकडील शेतजमीन मालकांनी जिल्हाधिकारी यांनी ठरविलेल्या दरात जमिन देण्यास नकार दिल्याने भूसंपादनाची प्रकिया थांबली.आता भूसंपादनाच्या खोडय़ामुळे प्रकल्प आणखी काही वर्षांसाठी रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.

तिरोडा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पूल नसल्याने फाटकातून वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे दररोज मध्य रेल्वेच्या जलद आणि मालवाहक गाड्यावर त्याचा परिणाम होतो. तसेच फाटक ओलांडताना रेल्वेगाडय़ांच्या धडकेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी या पुलाचे काम सुरू करण्यात आले.मात्र उत्तरेकडील भूसंपादनाचा पेच कायम आहे. येथील नागरिकांकडून शेतजमीन जागेच्या मोबदल्याची मागणी अधिकची असल्याने उत्तरेकडी पूलाचे बांधकाम रखडले गेले आहे.

उत्तरेकडील पूलाच्या बांधकामाकरीता शेतजमिन असलेल्या मालकासोंबत चर्चा झाली असून शासनाने दिलेले दर नाकारल्याने बंधणकारक दर निश्चित करुन जमिन सपांदनाची प्रकिया येत्या आचारसंहिता संपल्यानंतर करण्यात येणार आहे.ती प्रकिया होताच पुलाच्या बांधकामाला सुरवात करण्यात येणार असून संपादति भागात ५ पिल्लर उभे करण्यात येणार आहेत.हा सरळ पूल उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उतरणा असल्याची माहिती महारेलचे अभियंते.श्री.शर्मा यांनी दिली.

blank