
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. रश्मी शुक्ला महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप केल्याचे आरोप यांच्यावर आहेत. रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसून येतंय. उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी १ वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावर सोपवण्यात आला आहे. राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड लवकरच केली जाणार आहे.