बुथप्रमुखांनी घरोघरी जाऊन मतदारांना घडी चिन्हा विषयी सजग करावे :- विजय कापगते,लोकपाल गहाणे

0
138

अर्जुनी मोर. -अर्जुनी मोर. विधानसभा निवडणुकीची तारीख जसजसी जवळ येत आहे.तसा निवडणुकीचा ज्वर चढत आहे.या क्षेत्रात काॅग्रेस,भाजप,व राष्ट्रवादीची वोट बॅक आहे.या क्षेत्रात ब-याच कालावधीनंतर काॅग्रेस चा पंजा चिन्ह दिसत आहे.या क्षेत्रात भाजपाचे ही मोठे प्राबल्य आहे.मात्र या निवडणुकीत भाजपाचे कमळ चिन्ह नसुन महायुतीमधुन भाजपाचे नेते व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी अजीत पवार गटात प्रवेश करुन उमेदवारी मिळवुन ते घडी चिन्हावर निवडणूक लढत आहेत. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीतील बुथ प्रमुख,आघाडी प्रमुख,जि.प.व पंचायत समीती सदस्य व अन्य शेवटच्या पदाधिकारी तथा महायुतीतील सर्व मित्र पक्षातील कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांचे चुनाव चिन्ह घडी आहे .यासाठी घरोघरी थेट मतदारांपर्यंत जावुन मतदारांना सजग करावे असे आवाहन भाजपाचे विजय कापगते,राष्ट्रवादीचे लोकपाल गहाणे यांनी केले आहे.
अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात निवडणुक लढवित आहेत.या निवडणुकीत कुणाला पक्षांतर करुन उमेदवारी मिळवावी लागली तर कुणाची पक्षानी तिकीट कापली.तर कुणी पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करून अपक्ष निवडणुक लढवित आहेत. यामधे प्रामुख्याने महाविकास आघाडी व महायुती मधे बंडखोरी झालेली आहे.या मतदार संघात भाजपाची मते मोठ्या प्रमाणात आहेत.त्याच बरोबर राष्ट्रवादीचेही मतदान आहेत.मात्र वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार येथे राष्ट्रवादीच्या घडी चिन्हावर माजी मंत्री राजकुमार बडोले हे निवडणुक लढवीत आहेत. सध्यातरी भाजप,राष्ट्रवादी काॅग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बडोले साहेबांच्या प्रचारात घाम गाळत आहेत.महायुतीचे उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांचेप्रती या मतदार संघात प्रचंड सहानुभूती व आपुलकी निर्माण झाली आहे.या मतदार संघात अनुसूचित जाती आणी जमाती मधेही बडोले यांचेविषयी प्रचंड आत्मविश्वास, सहानुभूती व आपुलकी निर्माण झाल्याने बडोले यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल असे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे.मात्र भाजप व इतर प्रवर्गामधे चिन्हाविषयी जो संमभ्र निर्माण होत आहे.तो संम्रभ दुर करण्यासाठी व महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांचे घडी चिन्हाची बटन दाबून निवडुन देण्यासाठी विधानभा क्षेत्रातील भाजप,राष्ट्रवादी कांग्रेस तथा मित्र पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्ते, बुथप्रमुख, आघाडी प्रमुख यांनी मतदारांचे घरापर्यंत जावुन बडोले यांचे घडी चिन्ह आहे.असे सांगण्याचे आवाहन भाजपाचे विजय कापगते, राष्ट्रवादीचे लोकपाल गहाणे यांनी केले आहे.