24.7 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home गुन्हेवार्ता बकी फाट्यानजिक भरधाव कारची दुचाकीला धडक

बकी फाट्यानजिक भरधाव कारची दुचाकीला धडक

0
95
सडक अर्जुनी,दि.१४ः-डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोहमारा नवेगावबांध रस्त्यावरील बकी फाट्याजवळ  भरधाव कार तसेच दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाल्याने गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.मृतक इसमाचे नाव धनराज सुरेश कापगते(४६) रा.वांगी असे आहे.
मृतक व्यक्ती धनराज कापगते मोटार सायकल क्रं. एम.एच.३५ सी.ई.५८७० नवेगावबांध वरून कोहमाराकडे जात असताना, समोरून येणारे भरधाव चारचाकी वाहन क्र.एम.एच.३५ ए.जी.४७४१ च्या चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने, दुचाकीला धडक दिली.या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे दाखल करण्यात आले. सदर व्यक्तीच्या प्राथमिक उपचारानंतर गोंदिया येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून, पुढील तपास पो.हवा. गुणवंत कठाने करीत आहेत.