रोजगारासाठी, शेतकरी व शेतमजुरांच्या उत्थानासाठी महायुतीला मतदान करा-वर्षा पटेल

0
71

गोरेगाव,दि.१४ः मोरगांव अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजकुमार बडोले यांच्या चुनाव प्रचारार्थ ग्राम बाम्हनी ता.गोरेगांव येथे सौ. वर्षाताई प्रफुल पटेल यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्तां सोबत संवाद साधला. प्रगती व उन्नती साठी, महीलांच्या आत्मनिर्भरतेसाठी, युवकांच्या रोजगारासाठी, शेतकरी व शेतमजुरांच्या उत्थानासाठी महायुतीच्या उमेदवारांना येणाऱ्या २० तारखेला मतदान करा असे आवाहन सौ. वर्षाताई प्रफुल पटेल यांनी केले.

निवडणुकीच्या पथ्यावर थापा मारणारे अनेक येणार आहेत. परंतु, खर्‍या अर्थाने गेल्या ५ वर्षात सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या पाठिशी उभे राहून धडाडीचे निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत. त्याचबरोबर खा.प्रफुल पटेल या क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने झटत आहेत. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महायुती सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार राजकुमार बडोले यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन सौ.वर्षाताई पटेल यांनी केले.

यावेळी सौ. वर्षाताई प्रफुल्ल पटेल, केवल बघेले, कल्पना बहेकार मायाताई चौधरी, गीता बिसेन, प्राची ठाकूर, बेबी परिहार, कल्पना शेवटे, श्रद्धा रहांगडाले, ललिता पुंडे, शशी ताराम, वंदना पटले, भारती बिसेन, सुशीला कटरे, वर्षा वैद्य, खिलेश्वरी परिहार, कल्पना गजभिये, हौशीला मडावी, रितू बिसेन, गीता भलावी, मेसंधी मेश्राम, सीमा बिसेन, संगीता बिसेन, बाबा बोपचे, बाबा बहेकार, लालचंद चव्हाण, पराग चौधरी, सुरेंद्र रहांगडाले, रमेश बिसेन, नीलकंठ गौतम, उमेश बिसेन, तिलक कटरे, उमेन्द्र बिसेन, प्रल्हाद बिसेन, राजेन्द्र बिसेन, सुखदेव कटरे, पराग चौधरी, यशपाल पटले, भारत भलावी, ओमकार भलावी, गोपाल भगत, देतराम पटले, अनिल गौतम सहित मोठया संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.