टायर फुटून दुभाजकाला धडकलेली कार पेटली; एका भाविकाचा मृत्यू, चौघे जखमी

0
166

: उज्जैन खामगावजवळ दुर्घटना : लातूरचे रहिवासी
बुलढाणा—उज्जैनकडे दर्शनासाठी निघालेल्या लातूरच्या भाविकांची कार टायर फुटून दुभाजकावर आदळली. यावेळी पेट्रोलची टाकी फुटून आगीचा भडका उडाला. वेळीच बाहेर पडता न आल्याने वृद्ध भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कुटुंबातील पत्नी, मुले, सून अशा चौघांना नागरिकांनी बाहेर काढून वाचविले. खामगावजवळ हॉटेल सुदर्शननजीक २२ डिसेंबरच्या सायंकाळी साडेचार वाजता ही दुर्घटना घडली.
अरुण बाबुराव चिंचणसुरे (७२) असे मृत्युमुखी पडलेल्या भाविकाचे नाव आहे. लातूरचे रहिवासी अरुण चिंचणसुरे (७२) हे कुटुंबीयांसह अमरावती येथून उज्जैनला दर्शनासाठी निघाले होते. खामगावजवळ आल्यानंतर हॉटेल सुदर्शनसमोर कार (क्रमांक एमएच-२४-एडब्ल्यू-७९०४) चे टायर फुटले आणि चालकाचे नियंत्रण सुटले. दुभाजकावर धडकताच पेट्रोलची टाकी फुटल्याने गाडी पेटली. वाहन पेटताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. महादेव फंड यांनी खिडकीची काच फोडून आधी दोघांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. नंतर आणखी दोघांचे प्राण वाचविण्यात आले. परतू अरुण चिंचणसुरे (३६), आशिष अरुण चिंचणसुरे (३२), लक्ष्मी अरुण चिंचणसुरे (६१), शारदा पुणे (५५) यांना बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र अपघातात चौघे जखमी झाले. त्यांच्यावर खामगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाहेर पडता न आल्याने अरुण चिंचणसुरे यांचा होरपळून मृत्यू झाला.