मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन

0
36
परभणी, दि.१६  : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये मंगळवार (दि.१४) रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त मराठी भाषेवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कथाकार राजेंद्र गहाळ यांनी मराठी भाषेचे महत्व पठवून दिले व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जिवनात मराठी भाषेचा वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ग्रंथ प्रदर्शन दि. 14 ते 28 जानेवारी, 2025 दरम्यान सुरु राहणार आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. गाडेवाड यांनी केले.