धापेवाडा उपसा सिंचन टप्पा १ व २ चा लाभ योग्यरित्या द्या – आ. विजय रहांगडाले

0
70

तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले हे सतत विधानसभा क्षेत्रातील शेतक-यांना सिंचनासाठी सतत प्रयत्नशील राहत असून मंत्रालय असो किंवा स्थानिक स्तर असो शेतक-यांना जास्तीत जास्त सिंचनाचा लाभ कसा होईल यावर त्यांचे बारीक लक्ष असते आपल्या कारकिर्दीत त्यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्र १, २ पूर्णत्वास नेऊन चरण ३ चे काम सुरु करविले आहे उपसा सिंचन योजनेचा लाभ लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतक-यांना मिळावा याकरिता त्यांनी नहर दुरुस्तीकरिता विशेष निधी मिळवून काम सुरु केले आहे बोदलकसा जलाशय सद्यास्थितीत ८५ % भरले असून जलाशय पूर्ण भरल्यानंतर ४०० हेक्टर जमिनीला सिंचन होणार आहे, चोरखमारा जलाशय ७८ % भरले असून पूर्ण भरल्यानंतर ५०० हेक्टर जमिनीला सिंचन होणार आहे, खैरबंदा जलाशयाद्वारे १५५.३९ हेक्टर जमिनीला तर धापेवाडा उपसा सिंचन टप्पा १ द्वारे सुमारे २००० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होणार असून तिरोडा व गोंदिया लालुक्यातील एकूण ३०५५.५९ जमिनीमध्ये रबी धानपिक घेता येणार आहे. सदर बाबींचा आढावा घेतेवेळी अधीक्षक अभियंता श्री पराते, गोंदिया पाटबंधारे विभाग गोंदिया कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले, उपभियंता पटले, पंकज गेडाम, क.अभियंता यादव, मगर उपस्थित होते.