33.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home गुन्हेवार्ता आयशर ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत एक जागीच ठार

आयशर ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत एक जागीच ठार

0
76

अंजनगाव सुर्जी -तालुक्यातील कारला नजिक आयशर आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.आज दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अंजनगाव सुर्जी ते अकोट ह्या महामार्गावर कारला फाटा नजीक आयशर ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली असून सदर मृत इसम हा म्हैसांग जवळील कट्यार गावचा असल्याचे बोलल्या जात आहे. अपघातस्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली असून मृत व्यक्तीची अजून ओळख पटलेली नाही पुढील तपास अंजनगाव पोलीस करीत आहेत.