लाचखोर तलाठी फरार तर,दलाल एसीबीच्या जाळ्यात

0
15720
छत्रपती संभाजीनगरएका महिलेकडून शेत जमिनीच्या फेरफारासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यात तडजोड करीत अडीच हजार रुपयांत मांडवली करीत आपल्या दलाला मार्फत ती स्वीकारणं त्या तलाठ्याच्या अंगाशी आले असून दलाल एसीबीच्या जाळ्यात फसला हे पाहून तो लाचखोर तलाठी फरार झाला आहे.

पारध (ता. भोकरदन) येथील एका महिलेच्या जमिनीचा फेरफार करण्यासाठी पारध साजाचा  ग्राम महसूल अधिकारी अर्थात राज्य शासनाच्या महसूल विभागाचा कणा असलेल्या तलाठी अभय मधुकर कुलकर्णी यांने संबंधित महीलेकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्या तक्रारदार महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती.
 
     एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची पडताळणी करून सोमवारी दिनांक २४/२/२०२५ ला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपअधीक्षक बी.एम.जाधवर, पोलीस अंमलदार भालचंद्र बिनोरकर,गणेश चेके, अशोक राऊत यांनी सकाळी पारध तलाठी कार्यालयात सापळा रचून तडजोडी अंती ठरलेली लाच रक्कम रुपये २५०० रुपये स्विकारताना ग्राम महसूल अधिकारी अभय कुलकर्णी याचा खाजगी दलाल कृष्णा गणेश दळवी याच्या मार्फत स्विकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले असून दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.