१५ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळपाळीत-शिक्षण समितीचा निर्णय

0
40987

शिक्षण समितीच्या सभेत जि.प.उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापती हर्षेंनी दिल्या सुचना

गोंदिया,दि.२८ः  जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या पाया मजबूत करण्याकरिता केंद्रस्तरापासून शैक्षणिक दर्जा वाढवण्याकरिता शिक्षक भरती व्हावी, त्याचप्रमाणे तात्पुरती पर्यायी व्यवस्था जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात यावे. जिल्हा निधी व 15 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून शाळांकरीता स्वयंसेवक नियुक्त करुन शिक्षकांच्या कमी संंख्येच्या समस्येसवर तोडगा काढण्याकरीता जिल्ह्यातील खासदार,आमदार यांची मदत घेण्यात येणार आहे.त्याकरीता शिक्षण विभागाशी संबंधित यंत्रणेने बैठकीतील निर्णयांचे पालन करावे व शैक्षणिक दर्जा उंचवावे असे आवाहन बैठकीत शिक्षण सभापती हर्षे यांनी केले.सोबतच १५ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळपाळीत सुरु करण्यासंदर्भात बैठकित निर्णय घेण्यात आला.

येथील सामाजिक न्याय भवनातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्रीडा समिती मासिक सभा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण क्रिडा समिती सभापती सुरेश हर्षे यांच्या अध्यक्षतेत(दि.२७)पार पडली.सभेला प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी,माध्यमिक शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये,समितीचे जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर,शशीभाऊ भगत,नेहा केतन तुरकर,विमल बबलू कटरे,तुमेश्वरी बघेले,अंजली अटरे,लक्ष्मी तरोणे यांच्यासह सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी,जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख व शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.शिक्षण सभापती श्री हर्षे यांच्या कार्यकाळातील पहिल्याच शिक्षण व क्रिडा समितीच्या बैठकिला पहिल्यांदाच जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांना पाचारण करण्यात आले होते.

शिक्षण समिती सभापती सुरेश हर्षे यांनी 8 दिवस 8 तालुक्याला आपण भेटी देणार असल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे समितीचे जि.प. सदस्य, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांनी पण शाळांना भेटी द्यावे असे निर्देश दिले.सर्व केंद्रप्रमुखांनी प्रत्येक शाळेला महिन्याकाठी 1 भेट देणे व प्रत्येक दोन महिन्यांनी घेतलेल्या घटक चाचणी परीक्षेची नोटबुक तपासून स्वाक्षऱ्या करणे,त्यावर पालकांच्या स्वाक्षऱ्या घेतले जातात की नाही ते बघणे,मुलांना शिक्षणाबाबत प्रश्न विचारून उपस्थिती,गुणवत्ता बघणे यासारखे अनेक बाबीवर भर देण्यात यावे असेही सांगितले.
विस्तार अधिकारी यांनी केंद्रप्रमुखाचे व्हिजिट तपासणे, शिक्षक वेळेवर येणे, शासकीय कामावर जात असताना हलचल रजिस्टर नोंद रजिस्टर तयार करणे,केंद्रप्रमुख,गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी व तालुकास्तरावरील कर्मचार्यांचे हलचल रजिस्टर कामांची नोंद घेण्याची सुचना दिली.शिक्षण विभागाशी संबंधित विषय समितीच्या मंजुरीनेच शिक्षण सभापती यांच्या अनुमतीनेच स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेला ठेवावे असे निर्देशही दिले.सन 2025-26 करीता 200 स्वयंसेवक घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले.