तिरोडा बाजार समिती परिसरात २ कोटीच्या कामाचे भूमिपूजन

0
43

तिरोडा,दि.२८ः कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा येथे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून २.०० कोटी रुपयाच्या मंजूर निधीतील विविध कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले.सदर निधीमध्ये ५ लिलाव शेड १.२५ लक्ष, ०३ इमारत बांधकाम ७५.०० लक्ष रुपये अशा कामांचा समावेश आहे.या वास्तूंचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले, उपसभापती भूमेश्वर रहांगडाले संचालक घनशाम पारधी, भूषण झरारीया,रविंद्र वहिले, डॉ.गोवर्धन चव्हाण, मिलिंद कुंभरे,जयप्रकाश गौतम,प्रतिमा जैतवार,लिलाबाई नागरिकर माजी प्रशासक संजय बैस व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.