गोरेगाव,दि.१०ः- नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र गोरेगाव यांच्या तर्फे जागतिक महिला दिन 8 मार्च च्या अनुशंगाने तहसिल कार्यालय गोरेगाव येथे आरोग्य शिबीरातुन महिला अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.या शिबिरात तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांच्या उपस्थिती मध्ये तहसील कार्यालयाचे कर्मचारी यांचे जनरल चेकअप व रक्त तपासणी करण्यात आली.
प्रज्ञा भोकरे यांनी फास्ट फूड शरीरास हानिकारक असून घरचा सकस आहार हेच निरोगी आरोग्याचे सूत्र असल्याचे याप्रसंगी सांगितले.आरोग्याच्या बाबतीत महिलांमध्ये विलक्षण अनास्था असते.महिलांकडून आजाराबाबत बारीक-सारीक लक्षणे व कुरबुरी कडे दुर्लक्ष होते जेव्हा मात्र या कुरबुरी वा आजाराबाबत स्वरूप मोठे होते तेव्हा आपण हात पाय गाळून बसतो. कारण त्याची आर्थिक तरतूद आमच्याकडे नसते आणि मनाने पण आपण खचून जातो. म्हणून महिलांनी व्यवसाय, शिक्षण किंवा नोकरी असो आपल्या तब्बेतीकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठी किमान वर्षातून एकदा आरोग्य तपासणी त्यात हिमोग्लोबीन,रक्तातील सर्व घटक, रक्तातील साखरेचे प्रमाण,रक्तदाब, थॉयराईड,एच.आय.व्ही, सिकलसेल यासारखे तपासणी करुन घेणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी सांगितले.
तपासणी कार्यकेमात घुमरा आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी बिसेन,आरोग्य सेवक सचिन लोणारे, प्लेबोटोमिस वर्षा भोयर व लॅब टेकन्निशियन आरती चामलाटे यांनी आरोग्य सेवा दिली.तसेच या शिबिरामध्ये हिमोग्लोबीन,सीबीसी,रक्तातील विविध घटक,रक्तातील साखरेचे प्रमाण,रक्तदाब,थॉयराईड,एच.आय.