38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ उमरेड-कऱ्हाडलाच्या “एफ-२” वाघिणीच्या बछड्यांची मस्ती कॅमेऱ्यात कैद

उमरेड-कऱ्हाडलाच्या “एफ-२” वाघिणीच्या बछड्यांची मस्ती कॅमेऱ्यात कैद

0
93

blank

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘जय’ या वाघाने. नागझिरा अभयारण्यातून नैसर्गिक स्थलांतर करुन आलेला हा वाघ नंतर कधी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा झाला ते कळलेच नाही. कधी राष्ट्रीय महामार्गावर, कधी नद्या ओलांडणाऱ्या ‘जय’ ला पाहण्यासाठी सामान्य पर्यटकांपासून तर ‘सेलिब्रिटी’ अशी सर्वांचीच गर्दी असायची. मात्र, ‘जय’ गेला आणि पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर ‘फेअरी’ ही वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना आकर्षित केले. त्यानंतर पुन्हा पर्यटकांनी पाठ फिरवली.

आता ‘एफ-२’ नावाची वाघीणसुद्धा तिच्या पाच बछड्यांसह पर्यटकांना आकर्षित करत आहे. असाच एक या वाघिणीचा तिच्या बछड्यासह मस्ती करतानाचा क्षण वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी चित्रित केलाय.उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव गेट जवळ सध्या एक वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. “एफ-२” नावाच्या या वाघिणीसह तिच्या पाच बछड्यांचे उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांना दर्शन होत असल्याने पर्यटक सुखावले आहेत. “एफ-२” वाघीण ही “फेअरी” वाघिणीची मुलगी आहे. “एन-४” आणि “पाटील” नावाच्या दोन वाघासोबत तिचा वावर होता.

blank