29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला,स्फोटके गडचिरोली पोलिसांकडून जप्त…

नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला,स्फोटके गडचिरोली पोलिसांकडून जप्त…

0
198

blank

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कवंडे येथील जंगलात नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.९ मार्चला गडचिरोली पोलीस दलाने छत्तीसगड सीमेवरील शेवटचे गाव असलेल्या कवंडे येथे पोलिस ठाण्याची उभारणी करण्यात आली. शनिवारी कवंडे येथील पोलीस ठाण्यातील विशेष अभियान पथकाचे जवान परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना पोलीस मदत केंद्रापासून दक्षिणेला शंभर मीटर अंतरावर जंगलातील पायवाटेवर पोलिसांना एक भरमार बंदूक आढळली. शेजारच्या जागेत काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला.
त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांनी अत्याधुनिक उपकरणाद्वारे त्या जागेची तपासणी केली असता जमिनीत दीड ते दोन फूट खोल स्फोटके दडवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून ती नष्ट केली. यामुळे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावला गेला.पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात कवंडे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

blank