फुंडे सायन्स कॉलेजचे विश्वेष फुंडे अव्वल

0
61

गोंदिया,दि.०६ः लावन्या बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित फुंडे सायन्स कॉलेज फुलचुर, गोंदिया 12वी च्या परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला. वि‌द्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजची ग्रामीण भागात असलेली प्रतिष्ठा यावर्षीही कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर यांच्या फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत 188 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्थान पटकावले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विश्वेष गजेंद्र फुंडे यांनी प्रथम, मानसी संजीव हत्तीमारे यांनी द्वितीय, तर समीक्षा राजेंद्र चव्हाण आणि पूर्वा राजेंद्र खवासे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला. एकूण विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 89 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि 55 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवून महाविद्यालयाचे नाव उंचावले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे संचालक गजेंद्र फुंडे, सौ. मंजुषा फुंडे,नितीन फुंडे, प्राचार्या सौ. शुभांगिनी भंडारकर, प्रा. कंचन शर्मा, प्रा. पूजा तुरकर, प्रा. जयेश कुंभलवार, प्रा. शुभम अवस्थी, प्रा. अश्विन खोब्रागडे, प्रा. प्रकाश पाथोडे, प्रा. रवींद्र मस्करे, प्रा. दुर्गेश बिसेन, प्रा. तेजस भोयर, प्रा. शुभम घोसे आणि विनोद मत्ते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, वि‌द्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील आणि शिक्षकांना दिले.