गोंदिया,दि.१२ः जागतिक स्तरावर आपण अनेक वेगवेगळे दिन साजरे करत असतो. त्याच पद्धतीने निःस्वार्थपणे रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आधुनिक नर्सिंगच्या फाउंडर लेडी फ्लॉरेन्स नायटिंगल यांचा जन्म १२ मे रोजी झाला होता. त्यामुळे याच दिवशी म्हणजे १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेमध्ये तो दिवस ‘जागतिक परिचारिका दिन म्हणून घोषित करण्यात
आला.इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जात असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,एक के.टी.एस.जिल्हा सामान्य रुग्णालय,एक बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय,एक तिरोडा उपजिल्हा रुग्णालय,दहा ग्रामीण रुग्णालय, 45 प्राथमिक आरोग्य केंद्र, एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,263 आरोग्यर्धिनी उपकेंद्र,4 आपला दवाखाना,17 नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व यापाठोपाठ खाजगी रुग्णालयातुन लोकांवर आरोग्य उपचार दिले जात असल्याची माहीती डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
वास्तवात एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवणे जितके गरजेचे आहे, तितकीच त्याची काळजी घेणेसुद्धा गरजेचे असते. रुग्णालयात डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवितात; परंतु या शस्त्रक्रियेनंतर किंवा उपचारांनंतर त्या रुग्णाची सेवा शश्रूषा करण्याचे काम परिचारिका करीत असतात. उपचारांसोबतच रुग्णाला मानसिक आधार, त्याचे पथ्यपाणी सांभाळणेदेखील तितकंच गरजेचं असतं आणि हेच काम परिचारिका पार पाडतात. अगदी ऑपरेशन थिएटरपासून ते जनरल वॉर्डमध्ये रुग्णाला शिफ्ट करीपर्यंत नर्स कायम त्यांच्यासोबत असतात, त्यांची काळजी घेत असतात.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेविका ग्रामीण भागातील नागरिकांना 24 तास अहो दिवस रात्र हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, साथरोग, कुटुंबकल्याण, माता व बालआरोग्य, सिकलसेल, आदी विविध आजारांबाबत लोकांना प्रतिबंधात्मक आरोग्यशिक्षण व गृहभेटीदरम्यान उपचारात्मक आरोग्यसेवा देत आहेत.शासनाच्या विविध योजना जसे प्रधानमंत्री मातृवंदन, जननी सुरक्षा,जननी शिशु सुरक्षा,मानव विकास,नवसंजीवनी मातृत्व अनुदान योजना, आयुष्मान भारत योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवीत आहे.लसीकरण सत्रातून बालक व गरोदर मातांना लसीकरण व आरोग्यसेवा देत आहेत.संस्थास्तरावर सामान्य प्रसुती सोबतच आरोग्यविषयक माहिती त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून त्यावर उपचार करण्याचा सल्ला देत आहे.
त्यांच्या ह्या आरोग्य समाजसेवेच्या कामामुळेच शासनामार्फत जिल्हा स्तरावर आरोग्य परिचारिकांना आधुनिक परिचर्याचे जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल हा पुरस्कार देवुन दरवर्षी गौरविण्यात येत असतो हा पुरस्कार आरोग्य सेविका, आरोग्य सहायिका, स्टाफ नर्स अशा विविध प्रवर्गातुन देत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी दिली आहे.