गोंदिया जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष पदावर श्रीमती सीताबाई रहागंडालेंची निवड

0
256

गोंदिया,दि.१३ः भारतीय जनता पक्षाच्यावतीने संघटनात्मक निवडणुका पार पाडण्याची प्रकिया असून तालुका व मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर आज १३ मे रोजी गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर पहिल्यांदाच महिलेला स्थान देण्यात आले आहे.माजी जिल्हा परिषद सदस्या व भाजप महिला आघाडीच्या माजी महिला अध्यक्ष सीताबाई कमलेश रहागंडाले यांची आज भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष एड.येशुलाल उपराडे यांनी श्रीमती रहागंडाले यांचे अभिनंदन केले आहे.