पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल देवरी इथून आस्था डोये तालुक्यातून प्रथम

0
179

देवरी,दि.१३ः-पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथील इयत्ता दहावीचा आज लागलेल्या निकालामध्ये आस्था संजय डोये हिने 97.80 टक्के अंक घेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.तसेच नकुल रामाजी ढोबले 86.80 द्वितीय, यश प्रभू मनगटे 86.00 तृतीय ठरला. 69 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी गुणवत्ताधारक 13 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 21 व द्वितीय श्रेणीत 11 असा एकूण शाळेच्या 96 टक्के निकाल लागला.
पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल देवरी ही शाळा सन 2013 ते 18 या काळात बंद पडलेली असताना श्री.संयाम व त्यांची चमू यांनी तसेच गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली ही शाळा सुरू करण्यात आली. गुणवत्ताधारक विद्यार्थ्याचे अभिनंदन करताना दीपक कापसे मुख्याध्यापक यांनी भविष्यात या शाळेची प्रगती अधिकाधिक वाढवण्याच्या संकल्प व्यक्त केला. शाळेचे अध्यक्ष राजू चांदेवार व शाळा समिती अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य संदीप भाटिया,उपाध्यक्ष अर्चनाताई ताराम यांनी सुद्धा भावी काळात अशेच सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.वर्ग शिक्षक टेटे व इतर सर्व विषय शिक्षक यांनी वरील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात खूप मेहनत घेतली व त्यांना यशश्री प्राप्त करून दिली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी, एच.जी. राऊत शिक्षण विस्तार अधिकारी ,धनवंत कावळे गट समन्वयक ,ओमप्रकाश ढवळे केंद्रप्रमुख ,राजेश चांदेवार अध्यक्ष संदीपजी भाटिया अध्यक्ष शाळा समिती ,अर्चना ताराम उपाध्यक्ष, राजेंद्र मेश्राम माजी प्राचार्य ,दिपक कापसे मुख्याध्यापक , ङिलेस टेटे, लांजेवार सर ,पिल्लारे सर, खंडारे सर ,कुरधने सर, सहारे सर, कुंजाम सर ,कुथीर सर, नाईक सर ,गावाकडर मॅडम ,फुन्ने मॅडम ,ठवरे मॅडम, लीलारे मॅडम ,दहिफळे मॅडम, आनंद टेकाम बाबूजी तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांनी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.