देशद्रोही विजय शहांला अटक करा -डॉ.हुलगेश चलवादी

0
21
महिला सैन्य अधिकाऱ्यांविरोधात अपमानस्पद वक्तव्य बसप सहन करणार नाही


पुणे,दिनांक १६ मे २०२५,-
धार्मिक कट्टरता बाळगत महिला सैन्य अधिकाऱ्यांविरोधात अपमानस्पद वक्तव्य करणाऱ्या देशद्रोही मध्यप्रदेशचा मंत्री विजय शहा याची तात्काळ हकालपट्टी करीत त्याला अटक करावी ,अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शुक्रवारी (दि.१६) केली.
पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशाच्या सैन्याने शौर्य दाखवत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्वस्त केली होती.’ऑपरेशन सिंदूर’ ची नायिका कर्नल सोफिया यांच्या विरोधात शहांचे अशोभनीय वक्तव्यानंतर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर देशद्रोही मंत्र्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
परंतु,भाजप कडून या मंत्र्यावर काय कारवाई केली जाणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले. बसप च्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि देशाच्या आयरन लेडी, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावती जी यांनी देखील भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.एकीकडे देशभरात यात्रा काढत देशाच्या सैन्य दलाच्या शौर्या ची स्तुती करायची आणि दुसरीकडे शहां सारख्या देशद्रोही मंत्र्यांची हकालपट्टी न करता त्यांचा बचाव करायचा, हॆ भाजपच्या दुटप्पीपणाचे जिवंत उदाहरण असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
देशात धार्मिक तसेच जातीय द्वेष, घृणा, हिंसा आणि तणाव पसरवणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कुठलाही भेदभाव न करता न्यायालयांपूर्वीच कारवाई करने अपेक्षित असते.गुन्हे नियंत्रण तसेच कायदा-सुव्यस्थेच्या घटनात्मक जवाबदारीचे वहन कराण्याची जवाबदारी राज्य सरकारची असतांना देखील मध्यप्रदेश सरकार त्यात फोल ठरले आहे. सरकारच्या अपयशामुळे राज्याच्या अपेक्षित विकासाला खिळ बसली असून ही बाब देश आणि जनतहिथार्थ नाही,अशी बसप ची भूमिका असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
प्रथम परराष्ट्र सचिव आणि त्यानंतर सैन्य दलातील महिला अधिकाऱ्याबाबत केलेली घृणास्पद, असभ्य व अशोभनीय टिप्पणी, ही खरोखरच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे निर्माण झालेला उत्साह आणि आनंदावर विरजन टाकणारी आहे. संपूर्ण देश भारतीय लष्कराच्या पाकिस्तानविरुद्धच्या या कारवाईने उत्साहित असताना अशा प्रकारच्या घटना अत्यंत दुःखद आणि लाजिरवाण्या आहेत, असे मत सुश्री बहन मायावती जी यांनी व्यक्त केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले
या संदर्भात विजय शहा ने मुस्लिम महिला सैन्य अधिकाऱ्यांबद्दल केलेले वक्तव्य भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारने गांभीर्याने घेत सामाजिक समरसता आणि देशातील सौहार्द बिघडू नये याकरिता योग्य आणि कठोर कारवाई करने आवश्यक आहे, अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली.