एक्यूट पब्लिक शाळेतील ” गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह”

0
20

गोंदिया,दि.१७ः एक्यूट पब्लिक शाळेतील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेचे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आले. त्यात एक्यूट पब्लिक शाळेचा १००% निकाल लागला. ही बाब संस्थेसाठी, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यासाठी अतिशय कौतूकास्पद आहे.

HSC परीक्षेत, विज्ञान शाखेतील एकुण ३१ विद्यार्थ्यापैकी ३० विद्यार्थी प्रथम श्रेणित उत्तीर्ण झालेले आहेत. प्रथम क्रमांक फ़नेंद्र राजेशकुमार राहंगडाले (८६%), द्वितीय क्रमांक हिमांशु नंदकुमार सिहारे (८३%) व तृतीय क्रमांक मनीषा देवीप्रसाद नागपुर (८१%) यांनी परकावला आहे.
वाणिज्य शाखेतील एकुण ७ विद्यार्थ्यापैकी पूर्ण ७ विद्यार्थी प्रथम श्रेणित उत्तीर्ण झालेले आहेत. प्रथम क्रमांक आर्यन मनोज चंदानी (८६%) द्वितीय क्रमांक हर्षिका संजीवप्रसाद लील्हारे (८४%), व तृतीय क्रमांक डॉलसी महेशकुमार बिसेन (८३%) यांनी परकावला आहे.

SSC परीक्षेत प्रथम क्रमांक मुस्कान रंजीत माहुले (९३%),द्वितीय क्रमांक लुभानी राजू ठाकरे (९२%) आणि तृतीय क्रमांक समीक्षा अमर खोबरागड़े (८९%) यांनी परकावला आहे.

या सत्कार समरोहाला संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या सचिव श्री संजयकुमार भास्कर साहेब, सह सचिव एस. शुभा मैडम, शळेच्या मुख्याध्यापिका सौ. नंदा सोनवाने मैडम, रोजी किड्स कॉन्वेंटच्या मुख्याध्यापिका श्रीमती एकता पटले मैडम आणि सर्व शिक्षिका, पालकवर्ग, विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिति होते. श्री संजयकुमार भास्कर सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बहुमोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा भविष्यासाठी शुभाशीर्वाद दिले.