माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते प्राविण्यता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

0
30

गोंदिया : नुकत्याच 12वी मध्ये प्राविण्य श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रगती कॉलोनी, सिव्हिल लाईन गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते व शहर अध्यक्ष नानू मुदलियार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. आयोजक नफीज सद्दिकी व गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण मेघा सिंगनजुडे व प्राविण्य प्राप्त रितू सिंगनजुडे, अनास सिद्दीकी, निखिल लांजेवार, सौफिन शेख, प्रीती कापसे, अलिशा गणवीर, दीपांश बिसेन, कृपा ठाकूर, सम्यक चौरे, मनोहर झा, अर्णव गुप्ता, सेजल उके, रोहन चौहान, सेजल भेलावे, कार्तिक साखरे, शीतल पंचबुद्धे, काहेकसा शेख, कैफी शेख, साक्षी तांडेकर, निशा तांडेकर, एकता तांडेकर यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, नानू मुदलियार, खुशाल कटरे, बनसोड सर, पी के पटले, लुटलेश्वरजी, सिंगनजुडेजी, चौबेजी, सहारेजी, सेवनकरजी, विशेषण सर, अहिरजी, रोहित ठाकरे, प्रथमेश बिसेन, बलजीत सिंग, रेणू सिंग, दिनेश दुबे, अफरोज खान, रहिलेजी, जगदीश पाथोडे, रवी पटले सहित पालक गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.