
पुणे:-छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्
वैष्णवी हगवणे-कस्पटे यांच्या तक्रारीवर तात्काळ दखल घेण्यात आली असती, तर आज ती हयात असती, अशी खंत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.हॆ प्रकरण पुरोगामी महाराष्ट्राच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.समाज आता समोर आला नाही, तर अशा असंख्य वैष्णवीचा प्राण धोक्यात येईल;अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सासरच्या जाचाला कंटाळलेल्या, सततच्या हुंड्याच्या मागणीने पीडित भगिनींनी थेट बसप कार्यालय गाठावे,असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.
राज्यातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये हुंडा, सासरच्या जाचा संदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची तात्काळ सखोल चौकशी करीत त्यांना न्याय देण्याची मागणी, बसपची आहे.महिला आयोगाने देखील अशा तक्रारीसाठी वेगळी उपसमिती स्थापन करीत पोलीस प्रशासनाच्या मदतीने वेळीच तक्रारीची शहानिशा करने गरजेचे आहे,असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.
वैष्णवी हगवणे-कस्पटे आत्महत्या प्रकरणात कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस विभागाने काम करावे,असे आवाहन देखील डॉ.चलवादी यांनी केले.अशा कुठल्याही प्रकरणात राजकीय दबाव येता कामा नये.कुठल्याही पक्षाचा नेता, कार्यकर्ता, हितचिंतक असला तरी सर्वांसाठी कायदा सामान आहे असे डॉ.चलवादी म्हणाले. राज्यातील तमाम माता-भगिनींनी देशाच्या आयरण लेडी, सुश्री बहन मायावती जी यांच्या आदर्श समोर ठेवत लढत राहण्याची शक्ती, ऊर्जा मिळवावी,असे आवाहन यानिमित्ताने डॉ.चलवादी यांनी केले.