छ.संभाजीनगरचे आरडीसी ५ लाखाची लाच घेतांना अटक

0
175

छ. संभाजीनगर : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच (Bribe) घेण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) चक्क निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांस अटक करण्यात आली आहे. तब्बल 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने आरडीसीना रंगेहात अटक केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसी म्हणजेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकुनामार्फत ही लाच घेण्यात येत असताना अटक करण्यात आली असून विनोद खिरोळकर असं आरडीसींचं नाव आहे. वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठीपूर्वी या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार, संबधित तक्रारदाराकडून 23 लाख रुपये घेतले होते. मात्र, तरीही 18 लाख पुन्हा मागण्यात आले होते. त्यातील 5 लाख रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत ही लाच घेतली जात होती.