
चित्रा कापसे/ तिरोडा— आज सायंकाळी ५ च्या सुमारास तिरोड्याकडून तुमसर कडे जाणार्या ट्रक ने पांजराजवळ मोटार सायकल ला धडक दिल्याने मोटार सायकल स्वार नातू सारंग महेश येळे वय २० वर्षे मु.चिखली यांचा जागीच मृत्यू झाला तर आजोबा जुगराज बोपचे माजी सरपंच ग्राम पंचायत खुरुडी यांची मृत्यूशी झुंज असून पुढील उपचारा करीता त्यांना नागपूरला हलविले आहे,मिळालेल्या माहितीनुसार दोघेही आजेनातू होते त्यात नातवाचा जागीच मुत्यू झाल्याची दृखःद घटना घडली, गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.