36.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home शैक्षणिक मोहाडीच्या जी.ई.एस हायस्कूल येथे विद्यार्थींनींना सायकलचे वाटप

मोहाडीच्या जी.ई.एस हायस्कूल येथे विद्यार्थींनींना सायकलचे वाटप

0
327

गोरेगाव,दि.२८ः तालुक्यातील मोहाडी येथील जी.ई.एस.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज दिनांक २८ मे रोजी मानव विकास योजनेअंतर्गत गरीब गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, प्रमुख पाहुणे उपसरपंच मोहनलाल पटले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश पटले, उपाध्यक्ष गोपाल उके शाळेचे प्राचार्य राजेंद्र रहमतकर, नाना भोयर,शिक्षक तुरकर,जी.एल.राहागडाले,अशोक नान्हे,पराग रांहागडाले आदी उपस्थित होते.