38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता धनादेश अनादरप्रकरणी एक वर्षाची शिक्षा

धनादेश अनादरप्रकरणी एक वर्षाची शिक्षा

0
54

blank

हिंगणघाट : धनादेश अनादर प्रकरणी येथील न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी व्ही. एच. देशमुख यांनी आरोपी दत्तात्रय श्रीधरराव काळे, रा. हिंगणघाट यास दोषी ठरवून १ वर्षाची शिक्षा भोगण्याचा आदेश दिला. त्याने ७,५०,००० रुपये संस्थेला नुकसान भरपाई म्हणून द्यावे, त्यात कसूर केल्यास, पुन्हा ६ महिन्याची शिक्षा भोगावी, असा महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दिला आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, आरोपी दत्तात्रय श्रीधरराव काळे हे संतकृपा ट्रेडर्स या नावाने अडत व्यवसाय करीत असे. त्यांनी त्यांचे व्यवसायासाठी विदर्भ नागरी सहकारी पतसंस्था, हिंगणघाट यांच्याकडून ५ मार्च २०१५ रोजी ५ लाख रुपये कर्ज घेतले. त्या ‘कर्जाचे नियमीत हप्ते त्यांनी न भरल्यामुळे, त्यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०१७ रोजी ४लाख ९२ हजार ५६९ रुपये एवढी रक्कम थकीत झाली. त्या रक्कमेची परतफेड करण्यासाठी त्यांनी धनादेश फिर्यादी पतसंस्थेला दिला.

परंतु आरोपीच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम जमा नसल्याचे कारणाने तो धनादेश न वटता फिर्यादीकडे परत आला. त्या रक्कमेच्या मागणीबाबत नोटीस आरोपीला मिळुनही, त्याने फिर्यादीला धनादेशाची रक्कम दिली नाही. त्यामुळे सन २०१८ मध्ये त्याचेविरूद्ध फौजदारी न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणी याचीका दाखल केली होती. त्या प्रकरणात फिर्यादीतर्फे व्यवस्थापक अनिल रामभाउजी शेगोकर यांची साक्ष नोंदविण्यात आली.

आरोपीला बचावाची पूर्ण संधी देवून, न्यायाधिश व्ही. एच. देशमुख यांनी दोन्ही पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून घेतला आणि धनादेश अनादराबाबत गुन्हा सिद्ध झाल्याने, आरोपीला दोषी ठरविले आणि शिक्षा ठोठावली. फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने अ‍ॅड. एस. एन. ढगे, अ‍ॅड. आर. एस. ढगे, हिंगणघाट यांनी काम पाहिले.

blank