41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय मुरमाडी व मंगेझरीच्या सरपंचाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी

मुरमाडी व मंगेझरीच्या सरपंचाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी

0
142

blank

चित्रा कापसे/तिरोडा-तालुक्यातील मुरमाडी व मंगेझरी येथिल सरपंचानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवत युवा नेते रविकांत(गुड्डू) बोपचे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी केली. तिरोडा येथील रविकांत बोपचे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मुरमाडी सरपंच मंदाताई टेंभरे व मंगेझरी सरपंच छायाताई टेकाम यांनी घरवापसी केली.यावेळी युवा नेते रविकांत बोपचे यांनी पक्षाचा दुपट्टा घालून घरवापसी केली.

यावेळी रविकांत बोपचे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस सौ. मेघाताई बिसेन, तालुका अध्यक्ष कैलाश पटले,आशिष येरपुडे, संजय धुर्वे, युवक अध्यक्ष रविकुमार कुर्वे, सरपंच रविंद्र भगत, किशोर कुंभरे,नरेश जांगडे,चरण भाजीपाले आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

blank