39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोंदिया जिल्हा अनुसूचित जमाती सेल जिल्हाअध्यक्ष पदी...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोंदिया जिल्हा अनुसूचित जमाती सेल जिल्हाअध्यक्ष पदी संजय धुर्वे

0
152

blank

तिरोडा- गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गोंदिया जिल्हा अनुसूचित जमाती सेल जिल्हाअध्यक्ष पदावर संजय धुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली. युवा नेते रविकांत बोपचे यांच्या हस्ते नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष संजय धुर्वे यांना नियुक्ती पत्र देत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आले.

संजय धुर्वे  हे गेल्या काही वर्षांपासून पक्षाच्या कार्यामध्ये सक्रिय असून, त्यांनी विविध पदांवर काम करताना संघटन बांधणी, जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.या नियुक्ती प्रसंगी शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात कार्यरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे व पुरोगामी विचार अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे व पक्षासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष यांनी दिले. यासह सर्वसामान्य गरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी पुर्ण ताकतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काम करणार असल्याचे निर्धार यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी रविकांत बोपचे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस सौ. मेघाताई बिसेन, तालुका अध्यक्ष कैलाश पटले,आशिष येरपुडे, युवक अध्यक्ष रविकुमार कुर्वे, सरपंच रविंद्र भगत, सरपंच रंजित वालदे, सरपंच सौ. मंदाताई टेंभरे, सरपंच सौ. छायाताई टेकाम, किशोर कुंभरे,नरेश जांगडे,चरण भाजीपाले आदी सहित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank