37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ गिरोला येथील रोजगार हमी कामावरील लोकांची आरोग्य तपासणी  

गिरोला येथील रोजगार हमी कामावरील लोकांची आरोग्य तपासणी  

0
150

blank

आमगाव,दि.११-गोंदिया जिल्ह्यात रोजगार हमीचे कामे सुरू आहेत. एमआरजीएस कामावर आपल्या आरोग्याची काळजी न करता सकाळीच गावातील पुरुष व महीला कामावर जातात.आमगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गिरोला आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भुमेश्वर पटले यांच्या कल्पक विचारातुन त्यांच्या पथकाने दि.9 जुन रोजी सरळ गिरोला येथील रोजगार हमी कामाचे ठिकाण गाठुन तेथेच त्यांच्या आरोग्याची तपासणी केली.त्यावेळी तेथील लोकांची अंसासर्गिक कार्यक्रम अंतर्गत रक्तदाब व मधुमेह तपासणी.सिकलसेल रक्त तपासणी करण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ.भुमेश्वर पटले यांनी दिली आहे.
गिरोला येथील रोजगार हमी कामाचे ठिकाणी आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी गिरोला आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भुमेश्वर पटले ,समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्विनी येडे,आरोग्य सेविका दुर्गा फुंडे व तृष्णा उके,आरोग्य सेवक चेतन उईके,आशा सुनंदा रोकडे यांनी आरोग्य सेवा दिली तर शिबीरा दरम्यान वैद्यकिय अधिकारी डॉ.भुमेश्वर पटले यांनी असंसर्गजन्य आजार,संतुलित आहार व जीवनशैली, कीटकजन्य व जलजन्य आजार प्रतिबंधात्मक कार्यवाही बाबत मार्गदर्शन व समुपदेशन केले.

blank