
नागपूर, ११ जून 2025: मान्सून आता काही दिवसांवर आला असताना, शहरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित आणि अखंडित ठेवण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर, बुधवार, 11 जून रोजी नागपुरातील विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना तात्पुरती गैरसोय होऊ शकते, मात्र दीर्घकाळासाठी निर्बाध वीजसेवेसाठी ही कामे अत्यंत आवश्यक आहेत. नागरिकांनी याची नोंद घेऊन महावितरणला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.
कॉग्रेसनगर विभागात – सकाळी 8 ते दुपारी 12: नरसाळा, जयहिंगनगर, निलगगन. सकाळी 8 ते सकाळी 11: बहादुरा, गोधनी सीम, जगन्नाथनगर, लोकमान्य सोसायटी, जयंती नगरी – 6, पद्मावतीनगर, राजेश्वरी पार्क, मेश्राम लेआऊट, मनोहर सोसायटी, जयराम कॉलनी, ढोबीनगर, चिंतामनी 1 व 2, एन्सारा सिटी, रचना मिथीला, अथर्वनगरी 4 व 7, पिपळा गाव. सकाळी 8 ते सकाळी 11: अभ्यंकरनगर, हिंदुस्तान कॉलनी, पंकजनगर, फुटाळा चौक आणि परिसर, एलआयटी परिसर व वसाहत, अंबाझरी टेकडी. सकाळी 8 ते दुपारी 12: आरबीआय कॉलनी, महालक्ष्मी मंदिर, अभिनव कॉलनी, धरमपेठ सोसायटी, सितानगर. सकाळी 7.30 ते सकाळी 11: पी ॲन्ड टी कॉलनी, अत्रे लेआऊट, अरविंद अपार्टमेंट. सकाळी 8.30 ते सकाळी 11.30: फुलसुंगे लेआउट, अमरशा लेआउट, परफ़ेक्ट सोसायटी, पायोनियर ओरियन, आनंदनगर, प्रगतीनगर, घरकुल सोसायटी, राही इस्टेट, जयताळा बाजार चौक, केशवमाधवनगर, प्रसादनगर, हिरणवार लेआऊट, नागपूर विद्यापीठ सोसायटी, सौदामिनीनगर, पठाण लेआऊट, बंडू सोनी लेआऊट, गजानन नगर, पारेख लेआऊट, सरस्वती विहार कॉलनी, डंभारे लेआऊट, त्रिमुर्तीनगर, कॉसमॉस टाऊन, गोरले लेआऊट, द्रोणाचार्यनगर या भागात वीजपुरवठा बंद राहील.
सिव्हिल लाईन्स विभागात सकाळी 7 ते सकाळी 11: नई बस्ती, टेका, बाबा बुधाजीनगर, फारुकनगर. सकाळी 9.30 ते दुपारी 12.30: पॉवर ग्रिड चौक, रिंगरोड, कमाल चौक, वैशालीनगर, सॉ मिल, लष्करीबाग, इंदोरा, भीम चौक या भागात वीजपुरवठा बंद राहील.
गांधीबाग विभागात सकाळी 8.30 ते सकाळी 10.30: वर्धमाननगर कॉलनी, पूर्व वर्धमाननगर, सकाळी 8.30 ते दुपारी 1: नवीननगर, श्यामनगर, दुर्गानगर, निर्भया सोसायटी, सकाळी 9 ते सकाळी 11: तांडापेठ, नाईक तलाव, बांग्लादेश, बंगालीपंजा, पाचपावली, सकाळी 8 ते दुपारी 12: मेहंदीबाग, जामदारवाडी, कंजी हाऊस, कांजी चौक, जोशीपुरा, जयभोलेनगर, मटन मार्केट, होलसेल मार्केट, गांधीबाग बगीचा परिसर या भागात वीजपुरवठा बंद राहील.
महाल विभागात सकाळी 9 ते सकाळी 11: खरबी, रतननगर, सहकारनगर, गाडगेनगर, सकाळी 9 ते दुपारी 2: हसनबाग, राजेंद्रनगर, म्हाडा कॉलनी, नंदनवन, सकाळी 9 ते दुपारी 1: विदर्भ प्रीमियर सोसायटी, राजवाडा, गणेश चौक, लोधीपुरा, गांधीपुतळा, मिलन चौक, भालदारपुरा, गंजीपेठ, लोहारपुरा, हाश्मी टॉवर, काजीपुरा, सकाळी 7 ते सकाळी 10.30: बालाजीनगर, उल्हासनगर, नाईकनगर या भागात वीजपुरवठा बंद राहील
बुटीबोरी विभागात सकाळी 7 ते सकाळी 9: कँडीको वीज वाहिनीवरील एमआयडीसी उपविभाग – 2 अंतर्गत औद्योगिक परिसर, सकाळी 7 ते दुपारी 12: निलडोह वीजवाहिनीवरील एमआयडीसी अंतर्गत औद्योगिक परिसर, निलडोह गाव आणि सकाळी 7 ते दुपारी 12: एमआयडीसी उपविभाग – 2 अंतर्गत औद्योगिक परिसर या भागात वीजपुरवठा बंद राहील
महावितरणने केलेल्या या नियोजित वीज खंडिततेमुळे नागरिकांची गैरसोय होणार असली, तरी ही कामे मान्सूनच्या पार्श्वभूमीवर अत्यंत गरजेची आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्यासह इतर आवश्यक तयारी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या सहकार्याबद्दल महावितरण आभारी आहे.