38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home क्रीडा पुण्यातील राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

पुण्यातील राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

0
48

blank

गडचिरोली : महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेकरिता जिल्हा निवड चाचणी येथील सीआरपीएफ कॅम्पजवळील एम.आय.डी.सी.च्या मैदानावर पार पडली. यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 21 ते 23 जूनदरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणार आहे. या स्पर्धेमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे.

निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये पुरूष गटातून 100 व 200 मीटर धावणे स्पर्धेत शादाब बेग, अभिनव नैताम, 400 मीटर स्पर्धेत निशांत भुकया, कासिफ शेख, 800 मीटरमध्ये संदीप उसेंडी, 1500 मीटर अविनाश कांडो, अतुल पुसावी, 5000 मीटर यश बांदेकर, रोशन बोदलकर, 10 हजार मीटरमध्ये यश बांदेकर, अविनाश कांडो, लांबउडी स्पर्धेत अभिनव नैताम तर 4 बाय 100 रीले स्पर्धेकरिता अभिनव नैताम, दिनेश मडावी, अतुल पुसावी, देवित तलांडे, निशांत भुकया, तसेच 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धेकरिता अविनाश कांडो, यश बांदेकर, पीयुष सोनुले, ओमकार दरो यांची निवड करण्यात आली.

महिला गटात 100 मीटर धावणे स्पर्धेत मोनिका मडावी, 200 मीटरमध्ये श्रेया शेबे, 400 मीटर जयश्री करंगामी, नुतन चौके, 800 मीटर वैष्णवी दते, नुतन चौके, उंच उडी मोनिका मडावी, गोळाफेक श्रेया शेब तर 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेकरिता श्रेया शेबे, नुतन चौके, अमृता होळी, शितल गेडाम यांची निवड करण्यात आली.गडचिरोली जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव आशिष नंदनवार यांच्या मार्गदर्शनात निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला पंच म्हणून महेश वाढई, राहुल जुआरे, महेंद्र मने, अमोल बांगरे व जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

blank