33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ तिरोडा एसडीओ कार्यालयासमोरील सिमेंट रस्त्याचे निकृष्ट बांधकाम

तिरोडा एसडीओ कार्यालयासमोरील सिमेंट रस्त्याचे निकृष्ट बांधकाम

0
229

blank

चित्रा कापसे
तिरोडा,दि.१५- येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर नागरी सुविधा योजनेतंर्गत तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असतानाही प्रशासकीय अधिकार्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे काय अशा जनता विचारु लागला आहे.सदर रस्त्याचे काम करतांना मुरुमावर पाणी घालून रोडरोलर न चालविताच त्यावरच गिट्टी घालून सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले.
देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणात रस्त्याचा विकास यावर अवलंबून असतो,नागरिकांना जाण्यायेण्यासाठी त्रास नको यासाठी शासनाने अनेक योजनेअंतर्गत रस्ते बनवित असते. परंतु, सरकार रस्ते बनविण्याकरिता ज्या कंत्राटदारांना कंत्राट देत असते ते कंत्राटदार नित्कृष्ट दर्जाचे रस्ते बनवित असल्याचे तिरोडा उपविभागीय कार्यालयासमोरील नागरी सुविधा योजने अंतर्गत बनत असलेला सिमेंट रोड नित्कृष्ट दर्जाचा बनत आहे.या रस्ता बांधकामाची माहिती नगरपरिषदेचे कनिष्ठ अभियंत्याना दिल्यावरही त्यांनी कुठलीही कारवाई न केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे,तिथे मी स्वतः जाऊन पाहणी करुन सदर कंत्राटदारास चांगल्या दर्जाचे रस्ता बांधकाम करण्यासंबधी निर्देश देणार असल्याचे कनिष्ठ अभियंता अखिलेश सोनटक्के यांनी सांगितले.

blank