36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय माजी आमदार राजेंद्र जैन व प्रफुल अग्रवाल जिल्हा बँक निवडणूकीत निर्विरोध विजयी

माजी आमदार राजेंद्र जैन व प्रफुल अग्रवाल जिल्हा बँक निवडणूकीत निर्विरोध विजयी

0
1788

blank

गोंदिया,दि.१७- गोंदिया जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या २९ जून २०२५ रोजी होणार आहे.त्याकरीता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बँकेचे विद्ममान अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र जैन हे पगारदार व इतर नागरी संस्था गटातून निर्विरोध निवडून आले.या गटातून काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

त्याचप्रमाणे वैयक्तिक गटातून काँग्रेस गटाचे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक प्रफुल गोपालदास अग्रवाल हे निर्विरोध निवडून आले असून या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे निखिल राजेंद्र जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.यापुर्वी अर्ज पडताळणीमध्ये देवरी तालुका सेवा सहकारी गटातून भाजपचे प्रमोद संगीडवार हे निर्विरोध निवडून आले होते.या निवडणूकीत काँग्रेस राकाँ व भाजपचा प्रत्येकी एक संचालक निर्विरोध निवडून आला आहे.तर उर्वरित १७ जागांकरीता मात्र निवडणूक होणार आहे. सेवा सहकारी संघटना व काँग्रेस यांच्यात या निवडणुकीकरीता युती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.त्यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

blank