30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.पटले यांचा सत्कार

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.पटले यांचा सत्कार

0
110

blank

पोवार समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
गोंदिया,दि.२० : जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून डॉ.पुरूषोत्तम पटले यांची नियुक्ती झाली आहे. उच्च पदावर प्रथमच पोवार समाजाचे डॉ. पुरुषोत्तम पटले यांची नियुक्ती झाल्याने समाजाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
गोरेगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.पुरूषोत्तम पटले यांची गोंदिया जिल्हा शल्य चिकीत्सक पदावर वर्णी लागली. उच्चस्तरीय पदावर पहिल्यांदाच पोवार समाजातील व्यक्ती आरूढ झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान समाजाच्या शिष्टमंडळाने डॉ.पुरूषोत्तम पटले यांची भेट घेवून सत्कार केला. यावेळी पवार प्रगतिशील मंच गोंदियाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.पी.सी.चव्हाण, अखिल भारतीय क्षत्रिय पवार महासभेचे संघटन सचिव राजकुमार (पप्पू) पटले, माजी संघटन सचिव व बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे, डॉ.घनश्याम तुरकर, प.स.सदस्य अजाबराव रिनायत, पवार प्रगतिशील मंचचे माजी संचालक महेंद्र बिसेन, भागचंद्र रहांगडाले, दिलीप पारधी, पवार प्रगतिशील मंचचे माजी संचालक पंकज पटेल, माजी सचिव डॉ.प्रीती गौतम (देशमुख), डॉ.मोहित गौतम, पवार प्रगतिशील मंच संचालिका धनिषा कटरे, दीप्ती पटले, राजू येडे, पवन फुंडे आदी उपस्थित होते.

blank