30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जनजागृतीमुळे पूर परिस्थितीवर मात करणे शक्य – पठाण

जनजागृतीमुळे पूर परिस्थितीवर मात करणे शक्य – पठाण

0
28

blank

कोरणीघाट बाघनदी येथे पूर परिस्थिती बाबत रंगीत तालीमेचे आयोजन

गोंदिया, दि.20 : मान्सूनपूर्व तयारी 2025 च्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदियातर्फे पूर परिस्थितीत शोध व बचावकार्य संबंधाने गोंदिया तालुक्यातील कोरणीघाट बाघनदी येथे 18 जून 2025 रोजी शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थितीत सुरक्षा व बचाव तसेच पूर परिस्थितीत उपयोगी पडणारे शोध बचाव साहित्यांची तपासणी करून रंगीत तालीम घेण्यात आली.

मागील वर्षी 2024 मध्ये राज्याची पूर परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यात नागरिकांसाठी शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम व पूर परिस्थितीमध्ये सुरक्षा व बचाव या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. पूर परिस्थितीमध्ये जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदियातर्फे सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने नागरिकांना पूर परिस्थितीमध्ये तात्काळ मदत पुरविण्यासाठी जिल्हा शोध व बचाव पथकातर्फे गोंदिया तालुक्यात रंगीत तालीम व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.blank

मान्सूनपूर्व तयारी 2025 च्या अनुषंगाने गावपातळीवर तसेच शाळा व महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच हवामान खाते व पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांना व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्याकरिता तालुका व गाव पातळीवर व्हाट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहे. अग्निशमन विभाग नगरपरिषद गोंदियाच्या वतीने या ठिकाणी अग्नीवर नियंत्रण व सुरक्षा या विषयावर लोकचंद भेंडारकर लीड फायरमॅन यांनी उपस्थितांना माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले.

सदर रंगीत तालीम व प्रशिक्षण कार्यक्रमात समशेर पठान तहसीलदार गोंदिया, वैभव पवार पोलीस निरीक्षक रावणवाडी, महेश देशमुख परिविक्षाधीन तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जयंत शुक्ला, शोध बचाव पथकाचे सदस्य नरेश उईके, दिनू दिप, सुरेश पटले, अमित मेश्राम, जसवंत रहांगडाले, चालक मुकेश अटरे, होमगार्ड ट्रेनर इंद्रकुमार बिसेन, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

blank