इम्पेरियल कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी फार्म प्रथम वर्षाच्या परिक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

0
25

तिरोडा,दि.२३ः तिरोडा येथील प्रगत विद्या फाउंडेशनच्या द्वारे चालविल्या जाणाऱ्या इम्पेरियल कॉलेज ऑफ फार्मसी येथील डि.फार्म प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मे 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ मुंबई यांच्याद्वारे घेतलेल्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.या परीक्षेत प्रथम क्रमांक हर्षल टन्नूलाल छत्तांनी याने 85.5% , द्वितीय क्रमांक वैष्णवी नरेंद्र येळे हिने 75.4% आणि आता तृतीय क्रमांक आस्था जगदीश असाठी हिने 66.8% गुण मिळवून पटकावला.या यशाबद्दल इम्पेरियल कॉलेज ऑफ फार्मसी चे विश्वस्त मंडळ,प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.प्रगत विद्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भूपेंद्र भोंगाडे, सचिव शिवशंकर बोपचे तसेच विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे आणि प्राध्यापक वर्गांचे अभिनंदन केले आहे.