41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home शैक्षणिक पहिल्या दिवशी आमदार विजय रहांगडाले यांच्याहस्ते चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत

पहिल्या दिवशी आमदार विजय रहांगडाले यांच्याहस्ते चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत

0
42

blank

चित्रा कापसे/तिरोडा- शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने तालुक्यातील गुलाबटोला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शैक्षणिक सत्र २०२५–२६ च्या पहिल्या दिवशी एक आगळा-वेगळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला आमदार विजयभाऊ रहांगडाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सत्राच्या पहिल्या दिवशीच नव्या इयत्तेत दाखल झालेल्या चिमुकल्यांचे आमदारांच्या हस्ते गुलदस्ते, टोप्या, पाटी-पुस्तके व शालेय साहित्य देऊन अतिशय जिव्हाळ्याने स्वागत करण्यात आले. या विशेष क्षणाने विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारला होता,या वेळी आमदार विजय रहांगडाले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.“या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या समाजाचं आणि राष्ट्राचं उज्वल भविष्य दडलेलं आहे. त्यांना चांगल्या सुविधा आणि प्रेरणा देणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी अधिकारी स्नेहल रामटेके, प.स.सदस्य जयप्रकाश पटले, सरपंच जुनेवार, पत्रकार रमाकांत खोब्रागडे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.