कुख्यात आरोपीची अमरावती तुरुंगात रवानगी

0
236

गोंदिया,दि.26- . जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी प्रजित नायर यांनी नवाटोला येथील कुख्यात आरोपी प्रेमसागर ऊर्फ मिथून भैयालाल ठाकरे (31) याची एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी अमरावती तुरुंगात रवानगी केली. ही कारवाई बुधवारी (दि.25) करण्यात आली. ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली आरोपींविरुद्ध 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवाटोला येथील कुख्यात आरोपी प्रेमसागर उर्फ मिथुन भैयालाल ठाकरे याच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी त्याच्या साथीदारांसह पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गरीब कामगार, सामान्य नागरिक, सामान्य व्यापारी आणि व्यावसायिकांना दिवसरात्र हातात शस्त्रे दाखवून मारहाण करत आणि लुटत असे. त्यामुळे या परिसरातील नागरिक घाबरले होते. तसेच, लहान मुलांना आपल्यासोबत ठेवून त्यांना बेकायदेशीर काम करायला लावण्याचा त्याचा हेतू होता हे नाकारता येत नाही, त्यामुळे त्याच्या कृतींमुळे त्याचे कुटुंब, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांसाठी धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालयांमध्ये आणि रुग्णालयात काम
करणाऱ्यांना त्यांचे दैनंदिन काम करणे कठीण झाले होते.
तसेच, त्याने नागरा गाव परिसरातील लोकांना त्याच्याविरुद्ध गेल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याच्याविरुद्ध वारंवार कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात कोणताही बदल झाला नाही. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे, महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, हवालदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, संजय चव्हाण, छगन विठ्ठले, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय तिरोडा येथील अंमलदार गोस्वामी, पो. ठाणे ग्रामीण देवानंद पारधी यांनी पार पाडली.