मुख्याध्यापक विजय पटले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

0
14

तिरोडा-तालुक्यातील प्रगती हायस्कूल सरांडी चे मुख्याध्यापक विजय मोडकुजी पटले हे नियतकालिन वयोमानानुसार दि.३०/६/२०२५ ला सेवानिवृत्त झाले.दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीपर सपत्नीक शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रगती हायस्कूल सरांडीचे माजी मुख्याध्यापक रामसागर धावडे, संस्थेचे सचिव डॉ.अभय पाटील, संस्थेचे अध्यक्ष माणिक वाणी, इतर पदाधिकारी तसेच शाळेतील शिक्षिका जयाताई धावडे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार समारंभात उपस्थित होते.सत्कार समारंभात अत्यंत भावूक होऊन बोलताना मुख्याध्यापक विजय पटले म्हणाले की मी माझे संपूर्ण जीवन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी समर्पित केले होते.विद्यार्थ्यांशी असलेला जिव्हाळा व माझ्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी दिलेला प्रेम आपुलकी माझ्या जिवनाची शिदोरी असेल, प्रगती हायस्कूल सदैव माझ्या स्मरणात कोरलेले असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा कार्यरत असेल.