
तिरोडा- तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सालेबर्डी येथे सहकार सप्ताह निमित्ताने एक पेड मॉं के नाम या विषयावर सहाय्यक निबंध कार्यालय तिरोडा वतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली. विजयी विद्यार्थ्यांना जिल्हा उपनिबंधक (डी डी आर) अर्चना माळवे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार कु शितल चक्रधर लांडे,
रोख 551 रुपये, द्वितीय पुरस्कार कनक उमाशंकर दमाहे रोख 351 रुपये व तृतीय पुरस्कार गुंजन जिवतू बाभरे 251 रुपये रोख ही पुरस्काराची रक्कम जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्याकडून देण्यात आली. तसेच एक पेड माॅं के नाम ह्या उपक्रमांतर्गत जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, तिरोडाचे सहाय्यक उपनिबंधक डी.आर. नवगिरे, आमगावचे सहाय्यक उपनिबंधक हरिहर कुहिकर ,बबीता गिरीपुंजे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेत पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डी बी साकुरे , शिक्षण विस्तार अधिकारी जे डी अंबुले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उमाशंकर दमाहे, शाळेचे मुख्याध्यापक के एस राहंगडाले, सहायक शिक्षक जे ए जांगडे, भूषण झरारिया, कुमारी आमरीन सय्यदा उपस्थित होते.जिल्हा उपनिबंधक श्रीमती माळवे ह्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले.