आमगाव तहसीलवर नागरिकांची धडक

0
29

आमगाव- महाराष्ट्र शासनाने गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषदेचे विघटन करून आमगावला नगरपंचायत आणि रिसामा, कुंभारटोली, बिरसी, किडांगीपार, बनगाव, माल्ही, पदमपूर या सात गावांना ग्रामपंचायतीच्या दर्जा बहाल करण्यात यावा, याकरिता अधिसूचना काढली. मात्र, या अधिसूचनेला 6 महिने लोटूनही अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने या 7 गावांतील त्रस्त झालेल्या शेकडो संख्येत येऊन नागरिकांनी निकेश बाबा मिश्रा व तिरथ येटरे यांच्या नेतृत्वात अमर वराडे, सौरभ रोकडे, राजकुमार पुराम, संपत सोनी, जगदीश चुटे, बालू वंजारी, देवकांत बेहेकार, इसलाल भालेकर,भुमेश शेंडे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या 7 गावात रस्ते बांधकामाचा प्रश्न, घरकूल आणि विविध समस्यांनी हे सात गावातील नागरिक त्रासलेले होते.परंतु, शासन या गावांना ग्रामपंचायतीच्या दर्जा देण्यासाठी दिरंगाई करत आहेत.असा आरोप करुन बनगाव,बिरसी,पदमपुर, किडंगीपार येथील नागरिकांनी धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढला. यावेळी राजेश अग्रवाल, मुनेश पंचेश्वर, घनश्याम रहांगडाले, पिंटू अग्रहरी, संगीता पाथोडे, सोनू महानंदी, अनिता ठाकरे तसेच पुरुष महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.