
गोंदिया/भंडारा,दि.०८ : दोन दिवसांपासून गोंदिया/भंडारा जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. कालपासून तर पावसाने जोर धरला असून मुसळधार सुरू आहे. सर्वत्र नदी नाले ओसंडून वाहत आहेत,दोन्ही जिल्ह्यातील ४० च्या जवळपास मार्गही बंद पडले आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. असे असताना अतिवृष्टीसदृश्य पावसातही भंडारा जिल्ह्यातील शाळाना सुट्टी देण्यात आलेली नाही.याउलट गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तुमसर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे बपेरा राष्ट्रीय महामार्गावरील बावनथडी नदीच्या पुलावर जड वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरती बंद करण्यात आली आहे. हा मार्ग महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.

गोंदिया जिल्ह्यातील हे मार्ग बंद झाले 20
वडेगाव ते खोलदा
दिनकरनगर ते करांडली
प्रतापगढ ते कडोली
प्रतापगढ ते रामनगर
इलदा ते वडेगाव
चीचेवडा ते मुर्दोली
डवकी ते शिलापुर
गोटाबोडी ते बोरगाव
शेडेपार रस्ता
सिंगांडोह- रोपा
ककोडी/चिलाटी-
चीचगड-देवरी रोडवर परसोडी
बोरी ते मांडोखाल
कोरंबी टोला ते मांडोखाल
सिलेझरी ते येरंडी( विहीरगाव )
महागाव, शिरोली, ईटखेडा रस्ते
बोंडगाव / देवी ते खांबी व चान्ना ते बोंडगाव / देवी
गोंडमोहाडी- अर्जुनी
घाटकुरोडा-घोगरा
सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला ते घटेगाव
किंडगीपार ते जवरी पूल वाहतूक बंद
भंडारा जिल्ह्याती बंद मार्ग 13
▪️ भंडारा ते कारधा (लहान पुल)
▪️खमारी ते माटोरा
तुमसर
▪️गोंदेखारी ते टेमनी
▪️चुल्हाड ते सुकळी नकुल
▪️कर्कापूर ते रेंगेपार
▪️कर्कापूर ते पांजरा
▪️तामसवाडी ते सीतेपार
▪️सिलेगाव ते वाहनी
▪️सुकळी ते रोहा
▪️तामसवाडी ते येरली
मोहाडी
▪️उसर्रा ते टाकला
▪️डोंगरगाव ते कान्हळगाव ( सी.)
▪️ताडगाव ते सिहरी





