
तिरोडा–तालुक्यातील मारेगांव येथे काल दि.०७ जुलै २०२५ च्या रात्री अंदाजे १:०० ते २:०० वाजे दरम्यान शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने एक शेळी तीन बकरे ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकर्यांच्या तक्रारीवरून वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन, पंचनामा करण्यात आला. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त तात्काळ करून झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मारेगाववाशीयांनी वन विभागाला केली आहे.
सविस्तर असे की, तिरोडा तालुक्यातील मारेगांव येथे मागील आठ दिवसापासून बिबट्याची दहशत असून, ४ जुलैला धरमदास गोविंदा वंजारी यांचा एक बकरा, 5 जुलैला देवराज रहांगडाले यांचा एक गोरा ठार केला,६ जुलैला दिलीप ठाकरे यांची एक शेळी,७ जुलैला कवडू बोरीकर यांच्या चार शेळ्या, संजय कंगाले यांच्या दोन शेळ्या,यापूर्वी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. पण वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते.
काल रात्री बिबट्याने अंदाजे १ ते २ च्या सुमारास गोठ्यात एक शेळी,३ बकरे जागेवर ठार केल्याने शेळी मालकाला रात्री बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने गोट्यात गेले असता, हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरड करताच बिबट्या तिथून पडून गेला. लगेच गावकरी गोळा झाले. त्यांच्या तक्रारीवरून वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. यापूर्वी वन विभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. कालच्या घटनेमुळे पुन्हा एकदा गावातील पाळीव प्राणी पाळणाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





