
साकोली : गावाचा स्वर्ग करायचे असेल तर सर्वांनी झटले पाहिजे. आम्ही डॉ. हेमकृष्ण कापगते व मी जनसंघामध्ये वाढलो. जनसंघाच्या शाखा वाढवायल्या खूप मेहनत घेतली. परिश्रम घेतले. आमच्या काम केल्याने आत्मविश्वास वाढला आणि मेहनत, परिश्रम, संघर्ष केल्याने आत्मविश्वास वाढतो. मान सन्मान वाढतो व आपोआपच पदे आपल्याला मिळतात. मी राज्यपाल पद मागण्याकडे गेलो नाही. आपोआपच पंतप्रधानकडून मला फोन आला व आपल्याला बाहेर राज्यात जावे लागते, असे सांगितले गेले. त्यामुळे परिश्रमाचे हे फळ आहेत, असे मत राज्यपाल हरिभाऊ बागडे (Governor Haribhau Bagde) यांनी सांगितले.
समोर ते म्हणाले की शिक्षण हे चांगले असले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढला पाहिजे. डॉ. हेमकृष्ण कापगते यांचे वडील शामराव बापू कापगते तेव्हा मोठ्या अडचणीत त्यांनी जनसंघ उभा केला व चार आमदार निवडून आणले व महानगरपालिकेच्या उमेदवार निवडून आणले तो आणीबाणीच्या काळ होता. नवे-नवे शिक्षण घेतले पाहिजे. आता नवीन शिक्षण पद्धती आली. ती आता सर्वांनी अंगीकारले पाहिजे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे, असे मत माजी आ. डॉ हेमकृष्ण कापगते यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त भारत सभागृहात येथे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा या कार्यक्रमात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Governor Haribhau Bagde) यांनी आपले मत व्यक्त केले.
अतिशय साधे भोळे स्वतःला श्रीमंतीच्या गौरव नसणारा प्रामाणिक कार्यकर्ता, असे गौरवद्वार त्यांनी काढले. माजी खा. सुनील मेंढे यांनी सुद्धा त्यांच्या लहानपणीच्या एक प्रसंग सांगून डॉक्टर साहेब किती साधे-भोळे आहेत आणि संघाचे काम कसे प्लॅनिंग पूर्व पद्धतीने करतात. त्यांच्या काळात विविध चांगले कामे झालेले आहेत, असे मत व्यक्त केले. आ. परिणय फुके यांनी सांगितले की सेवेसाठी स्वतःला वाहून घेणारा वडेगाव येथे १९८९ पासून आरोग्य शिबिर मोफत देणारा सगळ्या क्षेत्रात काम करणारा व एक लाख झाडे संगोपण करणारा एक आदर्श म्हणून आमदार म्हणून ओळखला जातो, असे मत परिणय फुके यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे समितीचे सचिव राजू दुबे यांनी केले. आभार संचालन गायधने यांनी केले तर आभार अॅड. मनीष कापगते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राम चाचेरे, राजू दुबे, मनीष कापगते, विजय भाऊराव सखाराम कटरे, केशव मानकर, डॉ. प्रतिभा राजहंस, प्रवीण पटेल, गुलाब मेश्राम, कुंदन वलके, व्यंकटेश येवले, रेखा भाजीपाले, अरुण बडोले, गौरव कावळे, जनार्दन दोनोडे, मधु नगरकर, हिरालाल पारधीकर, दर्शन उंमरे, शंकर हातझाडे व इतरही सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.





