
गोंदिया,दि.१९ः गोंदिया जिल्हा मच्छीमार संघाच्या २२ जून रोजी झालेल्या संचालक मंंडळाच्या निवडणुकीत १२ पैकी ११ संंचालक शिवसेना शिंदे गटाचे नेता मुकेश शिवहरे यांच्या नेतृत्वात विजयी झाले होते.आज १९ जुर्ले रोजी झालेल्या जिल्हा मच्छिमार संघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत मुकेश शिवहरे व उपाध्यक्ष पदावर लक्ष्मीचंद मेश्राम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक पी.एच.सोनारकर यांनी काम पाहिले.![]()
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत मच्छिमार संस्थेचे संचालकामध्ये राजहंस ढोके, विनोद दानवे, बालचंद बाड़बराई, अभिमन मांडारकर, रोहित पटले, सुरेंद्र महापात्र, कल्पनाबाई नागपुरे, निर्मलाबाई बंसोड़, ताराचंद भोगारे, शिवलाल उके सहभागी झाले होते.यावेळी टोकेश हरिणखेडे,राजकुमार तिवारी, संजय बिसेन, आकाश खोबरागड़े, भरत भाऊ मेश्राम, जयेंद्र मानकर, महागु मेश्राम, कोदू टेकाम, रविन्द्र मेश्राम, रफीक शेख, गज्जू धुदबर्वे, घनशराम मेश्राम, किशोर तुमसरे, हरि भाऊ मांडारकर, भीमराव उके, राजेश दानवे, वासुदेव बांगड़कर, उपेंद्र (बापी) लांजेवार, सुनील सेंगर, मनीष गौतम, गोलू डोहरे, गुड्डू उके, सुशील मानकर, संदीप बासडकर, श्रीश तांडेकर, सीनू सनपला, धनुष लिल्हारे, दिल्लू गुप्ता, पिंटू बावनकर आदीनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.





