
तिरोडा-महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तिरोडा/गोरेगाव/दवाणीवाडा येथे आमदार विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्यांनी स्वतः रक्तदान करत समाजात एक सकारात्मक संदेश दिला.
सदर रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रहांगडाले यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजनने युवक, महिला आणि नागरिकांनी सहभाग घेतला. “सेवा हीच खरी शुभेच्छा” या भावनेतून आयोजित या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.रक्तदानानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस हे केवळ एक यशस्वी मुख्यमंत्रीच नाहीत, तर हजारो कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे नेतृत्व आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केल्याचा मला आनंद आहे.”
या उपक्रमात तिरोडा नगरपरिषद, गोरेगाव तालुका भाजपा पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था व युवक मंडळांनी सहकार्य केले. रक्त संकलनासाठी अधिकृत रक्तपेढीच्या प्रतिनिधींनी संपूर्ण वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या.सामाजिक जाणीवेतून आणि लोकहितासाठी केलेले हे रक्तदान शिबिर एक आदर्श उपक्रम ठरला आहे.
यावेळी प्रामुख्याने भाजप जिल्हाध्यक्ष सीताबाई रहांगडाले,माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले, प.स.सभापती चित्रलेखा चौधरी,भाजप गोरेगाव अध्यक्ष अनंता ठाकरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.





