33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावने केले वृक्षारोपण संवर्धनाचा संकल्प

प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावने केले वृक्षारोपण संवर्धनाचा संकल्प

0
97

blank

अर्जुनी मोरगाव,दि.३०ः राज्यात हरित महाराष्ट्र,समृद्ध महाराष्ट्रअभियानातंर्गत दहा कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्याचा संकल्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.त्या अनुशंगाने सर्व विभागांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात वृक्षारोपण करण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत.आरोग्य विभागाने सुद्धा आपल्या विभाग प्रमुखांना जैवविविधता जपण्यासाठी आरोग्य संस्था परिसरात वृक्षारोपण करण्याच्या सुचना निर्गमित केल्या आहेत.त्या अनुशगांने दि.29 जुलै 2025 मंगळवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोठ्णगाव येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर यांनी आपल्या चमुसह आरोग्य संस्था परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.पुर्ण पावसाळ्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचा संकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दि. 29 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोठ्णगाव येथे दर्शनीय भागात दहा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.सदर मोहिमेत वैद्यकीय अधिकारी स्नेहल गायकवाड, आरोग्य सहाय्यक संतोष पारधी व किशोर कुर्वे,आरोग्य सहायिका लक्ष्मी मुनेश्वर,फार्मासिस्ट मुकुल बडवाईक,आरोग्य सेवक अमोल मालेकर,आरोग्य सेविका प्रमिला रॉय व नामुर्ते,समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया चव्हाण,परिचर बंडु उईके,स्टाफ ब्रदर्स चिरायु वावरे,संगणक परिचालक फुलिचंद चौधरी यांनी सहभाग घेतला.

ऑक्सिजनशिवाय आपण जगूच शकत नाही.झाडे ऑक्सिजन ची निर्मिती करतात.रुग्णालय परिसरात वृक्षारोपण केल्यास वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.झाडं ऑक्सिजन बनवतात आणि ते हवेत प्रसार करतात.मानवास झांडामुळे शुद्ध हवा मिळत असते.तसेच आपल्या परिसरातील विषारी घटक कार्बन डायऑक्साइड आपल्या वातावरणामुळे किंवा आपल्या पर्यावरणास विषारी बनविते. झाडे हा कार्बन डाय ऑक्साईड वापरतात आणि त्यामुळे आपल्या पर्यावरण सुरक्षित रहात असल्यामळे सर्व आरोग्य संस्थानी आपला रुग्णालयाचा परिसर विविध वृक्ष लावुन त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन डॉ.देवेंद्र घरतकर यांनी ह्याप्रसंगी केले आहे.

blank