
गोंदिया, दि.31 : 29 जुलै 2025 च्या शासन निर्णयानुसार दि.1 ऑगस्ट 2025 रोजी महसुल दिन व दि.1 ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महसूल दिन 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नविन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत एकात्मिक पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन उपविभागीय अधिकारी/तहसिलदार स्तरावर कार्यक्रमांचे नियोजन करुन याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ सदर सप्ताहामध्ये घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी प्रजित नायर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी के.के.कांबळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अजय क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. या महसुल दिनाच्या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे स्वरुप : 1 ऑगस्ट महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण. 2 ऑगस्ट शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना सदर अतिक्रमीत जागांचे पट्टे वाटप करणे. 3 ऑगस्ट पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे. 4 ऑगस्ट छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे. 5 आगस्ट विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे. 6 ऑगस्ट शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्काशित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकार जमा करणे) निर्णय घेणे. 7 ऑगस्ट M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व महसूल सप्ताह सांगता समारंभ.





